निधोना आरोग्य उपकेंद्र वाऱ्यावर; ओपीडी कुलूप बंद

Foto
फुलंब्री, (प्रतिनिधी) तालुक्यातील बाबरा आरोग्य केंद्रा अंतर्गत निधोना येथील आरोग्य उपकेंद्र हे, बऱ्याच वेळा वेळेचे भान न ठेवता केव्हा ही चालू आणि केव्हा ही बंद दिसून येते याचा प्रत्यय सोमवारी (दि. ११ मे) रोजी दिसून आला. सकाळी ८ : ३० ते १२: ३० ही ओपीडीची वेळ असूनही अकरा वाजेपर्यंत ओपीडी कुलूप बंद अवस्थेत होती.

एकही आरोग्य कर्मचारी येथे उपस्थित न होते आरोग्य केंद्र हे स्थानिक स्तरावरील प्राथमिक आरोग्य सुविधा आहे, जी ग्रामीण व शहरी भागात ओपीडी, लसीकरण, प्रसूती, आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत औषधोपचार पुरवते. हे समुदाय "आयुष्मान आरोग्य मंदिर" आधारित दवाखाने आहेत, जिथे डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी कमी दरात किंवा मोफत सेवा देतात, जे गावांच्या वस्तीनुसार ५-६ उपकेंद्रे मिळून बनलेले असतात. 

आरोग्य केंद्रांची प्रमुख कार्ये आणि सेवा म्हणजे प्राथमिक उपचार ताप, सर्दी, खोकला आणि सामान्य आजारांवर उपचार. मातृ व बाल आरोग्य, गरोदरपण, बाळंतपण आणि लहान मुलांचे लसीकरण. राष्ट्रीय कार्यक्रम हिवताप, टीबी, कुष्ठरोग, आणि एड्स नियंत्रणासाठी आरोग्य सेवा. सुविधा औषधालय, प्रयोगशाळा आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा. आयुष्मान आरोग्य मंदिरः सध्या अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रुपांतर आयुष्मान आरोग्य मंदिरात करण्यात येत आहे, जिथे असंसर्गजन्य रोगांची तपासणी होते. 

महाराष्ट्र शासन आणि स्थानिक जिल्हा प्रशासन द्वारे ही केंद्रे चालवली जातात. आपत्कालीन आरोग्य उपकेंद्रात घाणीचे साम्राज्य या आरोग्य उपकेंद्रा समोर कचऱ्याचे ढीग लागल्याने सर्व परिसरात घाण पडलेले आहे यावरून तर असे जाणवते कि, गेल्या आठवड्याभरापासून या परिसराची साफ सफाईच झाली नसावी.

परिस्थितीत १०८ रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असते. मात्र या सर्व सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्यावरही आरोग्य उपकेंद्र कुलूप बंद ठेवणे म्हणजे ग्रामीण भागातील रुग्ण सेवेचा किती बॅट्या बोळ झालेला आहे यावरून दिसून येते.